चैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस !

चैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस !

नवी दिल्ली : थंडपेये आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कराशिवाय (GST) 15 टक्के सेवा उपकर म्हणजेच 'सेस' लावला जाणार आहे. यामुळे चैनीच्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काल (गुरुवार) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. GSTच्या या बैठकीत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर किमान सेस लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाले आहे. केंद्र सरकार 1 जुलैपासून देशात GST लागू करण्याच्या प्रयत्नात आहे.

केंद्र सरकारकडून राज्यांचा महसूल घटल्यास त्यांना भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे सरकारला सेसमधून मिळणार्‍या उत्पन्नातून ही भरपाई देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांपर्यंत राज्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

देशभरात GST लवकर लागू करण्यासाठी GST परिषदेच्या 11व्या बैठकीत 'इंटिग्रेटेड GST' कायद्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जेटलींनी दिली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात GST विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.

सध्याच्या प्रस्तावानुसार चैनीच्या वस्तू, महागड्या गाड्या आणि थंडपेयांवर किमान 15 टक्के सेस लावला जाण्याची शक्यता आहे. कोळशावर प्रति टन रु.400 सेस लावला जाईल. तर पानमसाल्यावर एडव्हेलोरम म्हणजेच वस्तूच्या मूल्यानुसार किमान सेस 135 टक्के सेस लागेल. शिवाय एक हजार रु.4170 किंवा 290 टक्के एडव्हेलोरम लागणार आहे. या वस्तूंव्यतिरिक्त केंद्राने इतर वस्तूंवरदेखील सेस लावण्याचा मार्ग खुला ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com