‘टाटा’कडून मिळणार 40 हजार तरुणांना संधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

नवी दिल्ली: ऑटो क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या 'टाटा मोटर्स'ने स्किल डेव्हलपमेंटसाठी तरुणांना संधी देण्याची तयारी सुरू केली आहे. टाटा मोर्टर्सकडून सुमारे 40 हजार लोकांना प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. येत्या तीन वर्षांच्या काळात 40 हजार तरुणांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्याचे कंपनीने ठेवले आहे.

'टाटा मोटर्स'कडून देण्यात येणार्‍या या स्किल डेव्हलपमेंट खासकरून बेरोजगार तरूणांना टेक्निकल (तांत्रिक) व्होकेशनल मॅन्युफॅक्चरिंग प्लँट आणि वेगवेगळ्या पातळीवरील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

खासकडून 10वी, 12वी पर्यंत शिकलेल्या किंवा अर्ध्यातूनच शिक्षण सोडाव्या लागलेल्या तरूणांना टाटा मोटर्सकडून प्रशिक्षणासाठी ही संधी देण्यात येणार आहे. कंपनीने मोटार वाहान कौशल्य विकास परिषदेच्या (एएसडीसी) माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू केले आहे. टाटा मोटर्समधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लोक निवृत्त होत असतात. त्यामुळे नवीन लोकांना प्रशिक्षण दिल्यामुळे रिक्त जागा भरून काढण्यासाठी कंपनीला मदत होते.

सध्या मुंबई शेअर बाजारात 'टाटा मोटर्स'चा शेअर 483.60 रुपयांवर व्यवहार करत असून 7.20 रुपयांनी म्हणजेच 1.51 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 417.10 रुपयांची नीचांकी तर 598.60 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु. 164,104.49 कोटींचे बाजारभांडवल आहे.