काळा पैसा पांढरा करणाऱ्या CA, CS यांच्यावर नजर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता काळ्या पैशाविरोधातील मोहीम आणखी व्यापक बनविण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सनदी लेखापाल तथा 'सीएं'वर (चार्टर्ड अकाऊंटंट) कारवाई होण्याची शक्यता आहे. 

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा केंद्र सरकार उगारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच नोटाबंदी करून काळ्या पैशाविरोधात पाऊले उचलणार असल्याचे मोदी सरकारने म्हटले होते. तथापि, काळा पैशाला पांढरे करून देणाऱ्या सीए आणि सीएस (कंपनी सेक्रेटरी) यांच्यावरही आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

काळा पैसा कायदेशीर करून देण्याच्या कामात बहुतांश वेळा सीएंची भूमिकाच कारणीभूत ठरते. काही दिवसांपूर्वीच विरेंद्र जैन आणि सुरेंद्र जैन या दोन सीएंना अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

कोण आहेत जैन बंधू?
तब्बल ९० बनावट कंपन्यांमध्ये ४ हजार कोटी रुपयांचा व्यवहार दाखवल्याचा आरोप विरेंद्र जैन आणि सुरेंद्र जैन या दोघांवर आहे. यात तब्बल ५५९ लोकांचा फायदा झाला असून, यात अनेक मोठी नावे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे आता सीए व्यावसायिकांवर केंद्र सरकार बडगा उगारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या सीए आणि सीएस लोकांची पाचावर धारण बसणार आहे.