अलेंबिक फार्माच्या नव्या औषधाला 'यूएसएफडीए'ची मंजुरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी दिल्ली : अलेंबिक फार्माच्या "असायक्लोवीर ऑईनमेंट युएसपी" या औषधाला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाची म्हणजेच युएसएफडीएची परवानगी मिळाली आहे. हे औषध एक प्रकारचे मलम असून त्वचारोगावर उपचार करताना वापरले जाणार आहे. अलेंबिक फार्माचे हे नवीन मलम उत्तर अमेरिकेच्या वॅलिएन्ट फार्मास्युटीकल्सच्या "झोविरॅक्स" या मलमाच्याच समतुल्य आहे. 

"झोविरॅक्स" ह्या मलमाची युएसएफडीएकडे नोंदणी झालेली आहे. अलेंबिक फार्माचे हे नवे मलम वेगवेगळ्या गंभीर त्वचारोगांवर उपचार करताना वापरले जाणार आहे. 

विषाणूंमुळे झालेल्या संसर्गामुळे होणाऱ्या त्वचारोगांवर ईलाज करताना या नव्या मलमाचा वापर केला जाणार आहे. या मलमाला अमेरिकेत मोठी बाजारपेठ आहे. जवळपास 942 कोटी रुपयांची बाजारपेठ या मलमासाठी अपेक्षित आहे.

आज (मंगळवार) मुंबई शेअर बाजारात अलेंबिक फार्माचा शेअर 9.75 रुपयांच्या घसरणीसह 527.30 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार 9,940.44 कोटींचे बाजारभांडवल आहे. 
 
Web Title: Alembic Pharma gets USFDA nod for Acyclovir ointment