देशभरात ९.३ कोटी पॅनची आधारशी जोडणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ 

नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी रविवारी दिली. 

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ 

नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी रविवारी दिली. 

देशात सुमारे ३० कोटी पॅन कार्ड आहेत. यातील ३० टक्के पॅन कार्ड आता आधारशी जोडण्यात आली आहेत. यातील तीन कोटी पॅन कार्ड जून व जुलैमध्ये आधारशी जोडण्यात आली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा शेवटचा दिवस ५ ऑगस्ट होता. या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ९.३ पॅन कार्ड आधारशी जोडण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅनशी आधार जोडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने या संख्येत वाढ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने १ जुलैपासून पॅनशी आधार जोडणे बंधनकारक केले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार क्रमांक अथवा आधार नोंदणी क्रमांक पुरेसा आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले होते. आता पॅनशी आधार जोडणी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. पॅनशी आधार जोडले नसल्यास प्राप्तिकर विवरणपत्र स्वीकारले जाणार नाही.