माजी गव्हर्नर राजन लिहिणार पुस्तक

पीटीआय
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन आता रिझर्व्ह बॅंकेच्या प्रमुखपदाच्या कालखंडावर पुस्तक लिहिणार आहेत. यामध्ये भारतीय सहिष्णुतेचा राजकीय स्वातंत्र्याशी संबंध आणि सुबत्ता आदी विषयांवर रघुराम राजन आपल्या पुस्तकातून प्रकाश टाकणार आहेत. या पुस्तकामध्ये रघुराम राजन यांच्या रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालातील निबंध आणि त्यांच्या भाषणांचा समावेश असणार आहे. ‘आय डू व्हाय आय डू’ असे राजन यांच्या पुस्तकाचे नाव आहे. 

सप्टेंबर २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर महागाई उच्चांकावर होती. तसेच भारताची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर होती, तसेच परकी गंगाजळी घसरत चालली होती. या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होत होता. अशा वातावरणात राजन यांनी समस्यांचा आत्मविश्‍वासाने सामना करत आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाचा पाठपुरावा केला, असे प्रकाशक संस्था हार्पर कॉलिन्स यांचे म्हणने आहे. राजन यांचे पुस्तक ४ सप्टेंबर रोजी वाचकांना उपलब्ध होणार आहे.