फिक्कीच्या कार्यक्रमातून चंदा कोचर बाहेर

पीटीआय
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी दिल्ली - व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जावरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी फिक्की लेडीज ऑर्गनायजेशनच्या (एफएलओ) कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात होणाऱ्या या कार्यक्रमात त्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान होणार होता. 

‘एफएलओ’च्या ५ एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका आधीच वितरीत करण्यात आल्या होत्या. यामध्ये चंदा कोचर यांचे नाव ठळकपणे दिसत होते. आता नव्याने पाठविण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकांमध्ये कोचर यांचे नाव वगळण्यात आले आहे. व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बॅंकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

Web Title: arthavishwa news chanda kochhar ficci ladies organisation