भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीनमध्ये कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

बीजिंग - चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत २०१३ पासून जवळपास १३ लाख कनिष्ठ अधिकाऱ्यांवर येथील भ्रष्टाचारविरोधी पथकाने कारवाई केली आहे. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘वाघ आणि माश्‍या’ या नावाने ही मोहीम सुरू केली असून प्रशासनातील भ्रष्ट असलेले वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याविरोधात कडक कारवाई केली जात आहे. पुढील महिन्यात चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची १९ वी परिषद भरणार असून, यामध्ये जिनपिंग हे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे यश सांगत आपली पकड अधिक मजबूत करण्याची चिन्हे आहेत.