‘ह्युंदाई’कडून फॅक्‍टरी-फिटेड सीएनजी ‘ह्युंदाई एक्‍सेंट प्राइम’ सादर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - ‘ह्युंदाई मोटर इंडिया’ने फॅक्‍टरी-फिटेड सीएनजीची ‘ह्युंदाई एक्‍सेंट प्राइम’ सेदान श्रेणीतील गाडी सादर केली आहे. ह्युंदाई मोटार इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, की ‘‘नवीन उपक्रमांद्वारे ह्युंदाई ब्रॅंड आमच्या ग्राहकांना कायमच उत्तम अनुभव देत राहील. ग्राहककेंद्रित कंपनीच्या रूपात या श्रेणीमध्ये कमी किमतीत अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’’ ह्युंदाईने एक्‍सेंट प्राइम सीएनजी दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करून दिली आहे. शिवाय १००,००० कि.मी./३ वर्षांच्या सर्वोत्तम-श्रेणीची वॉरंटीदेखील देऊ केली आहे.

नवी दिल्ली - ‘ह्युंदाई मोटर इंडिया’ने फॅक्‍टरी-फिटेड सीएनजीची ‘ह्युंदाई एक्‍सेंट प्राइम’ सेदान श्रेणीतील गाडी सादर केली आहे. ह्युंदाई मोटार इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, की ‘‘नवीन उपक्रमांद्वारे ह्युंदाई ब्रॅंड आमच्या ग्राहकांना कायमच उत्तम अनुभव देत राहील. ग्राहककेंद्रित कंपनीच्या रूपात या श्रेणीमध्ये कमी किमतीत अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’’ ह्युंदाईने एक्‍सेंट प्राइम सीएनजी दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करून दिली आहे. शिवाय १००,००० कि.मी./३ वर्षांच्या सर्वोत्तम-श्रेणीची वॉरंटीदेखील देऊ केली आहे. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या फॅक्‍टरी-फिटेड सीएनजीचे बरेच फायदे आहेत. जसे, की देशातील बऱ्याच ठिकाणी फॅक्‍टरी-फिटेड सीएनजीच्या वाहनांवर करसवलतदेखील मिळते.