परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारावर मेहरबान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजाराच्या महितीनुसार जुलै महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल १५ हजार कोटींची (२.४ अब्ज डॉलर) गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात १.६ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. आर्थिक सुधारणांच्या धडाक्‍याने देशात गुंतवणुकीस पूरक वातावरण तयार झाले असून, नुकताच सेन्सेक्‍सने ३२ हजार अंशांचा ऐतिहसिक टप्पा ओलांडला आहे. परिणामी परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.