आयसीआयसीआय बॅंकेला २,०४९ कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत रु. २,०४९ कोटींचा नफा झाला आहे. बॅंकेने आज पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

बॅंकेला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ते आता रु. ५,५९० कोटींवर पोचले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात बॅंकेच्या ठेवी १५ टक्के वाढीसह रु. ४.८६ लाख कोटींवर पोचल्या आहेत.

बॅंकेच्या एकूण थकीत मालमत्तेत (एनपीए) वाढ झाली आहे. ग्रॉस एनपीए ७.८९ टक्‍क्‍यांवरून वाढून आता ७.९९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. मात्र नेट एनपीए किंचित घटला आहे. तो ४.८९ टक्‍क्‍यांवरून कमी होऊन ४.८६ टक्‍क्‍यांवर आला आहे.

सरलेल्या तिमाहीत बॅंकेकडून बुडित कर्जासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीत घट झाली आहे. ती तरतूद आता रु. २,८९८ कोटींवरून कमी होऊन रु. २६०९ कोटी करण्यात आली आहे. जी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत रु. २५१४ कोटी होती. मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर ३०७.०५ रुपयांवर व्यवहार करीत होता. ३.१५ रुपयांनी म्हणजेच १.०२ टक्‍क्‍याच्या घसरणीसह तो बंद झाला. या शेअरने वर्षभरात २१५.४१ रुपयांची नीचांकी, तर ३२७.५० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.