उद्योग धोरण लवकरच - प्रभू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 

‘कॉफी विथ गोमन्तक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत आसोचाम या राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांच्या संघटनेतील लघु व मध्यम उद्योग समितीचे अध्यक्ष मांगिरीश पै रायकर होते.

प्रभू म्हणाले, ‘‘भारत जागतिक व्यापार संघटनेत आहे. याचा फायदा उद्योगांना करून दिला जाणार आहे. पोलाद निर्मितीत चीन आपल्या पुढे आहे. त्यामुळे त्यांचे दर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतात. अशा परिस्थितीत स्थानिक उत्पादकांना संरक्षण देण्याची सरकारची भूमिका असते. ती व्यापक केली जाणार आहे. ’’

कृषी उत्पादनांची निर्यात 
सुरेश प्रभू म्हणाले, ‘‘उपलब्ध जमीन आणि कृषी उत्पादन यांचा मेळ बसत नाही. उत्पादन जास्त झाले तर दर घसरण्याचा धोका असतो. त्यामुळेही उत्पादनवाढीकडे शेतकऱ्यांचे जास्त लक्ष नसते. मात्र, कृषी उत्पादनाला निर्यातीची जोड दिली गेल्यास हा धोका राहणार नाही.’’ 

गुंतवणुकीचा महामार्ग निर्मिणार 
विदेशी गुंतवणूकवाढीवर भर देण्यासाठी जगातील पाचशे बड्या कंपन्यांशी बोलणे सुरू केले आहे. त्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून गुंतवणूक आणून त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल, असेही प्रभू म्हणाले.