गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले

मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स होरपळून निघाले आहेत. सेबीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सबरोबर बड्या कंपन्यांच्या शेअर्सचीही जोरदार विक्री केली. सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्या आघाडीच्या १० पैकी ९ कंपन्यांनी या पडझडीत तब्बल एक लाख कोटींचे भांडवल गमावले आहे. 

सेबीने शेल कंपन्यांवर केलेल्या कारवाईचे पडसाद बाजारावर उमटले. आठवडाभरात सेन्सेक्‍समध्ये एक हजार १११ अंश आणि निफ्टीत ३५५ अंशांची घसरण झाली. आघाडीच्या १० कंपन्यांत इन्फोसिस वगळता इतर कंपन्यांनी एकूण एक लाख पाच हजार ३५७ कोटींचे भांडवल गमावले असून, मोठी घसरण झाली. 

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय या दोन बड्या शेअर्सला विक्रीची झळ बसली. त्याचबरोबर टीसीएस, एचडीएफसी बॅंक, आयटीसी, एचडीएफसी आदी कंपन्यांना शेअर्समधील पडझडीमुळे भांडवल गमवावे लागले आहे. इन्फोसिसचे बाजार भांडवल मात्र ५५१ कोटींनी वाढले आहे.

Web Title: arthavishwa news investor one lakh crore loss