‘एसबीआय लाइफ’चा आयपीओ खुला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - स्टेट बॅंकेची उपकंपनी असलेल्या ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ची बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरू झाली. पुढील दोन दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत या ‘आयपीओ’साठी अर्ज करता येणार आहे. 

२०१० मध्ये आलेल्या ‘कोल इंडिया’च्या आयपीओनंतरचा ‘एसबीआय लाइफ’चा आयपीओ सर्वांत मोठा आहे. ‘एसबीआय लाइफ’ने आयपीओच्या माध्यमातून रु. ८,४०० कोटींच्या निधी उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून याआधीच रु. २२२६ कोटींचे भांडवल उभारले आहे. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’मध्ये स्टेट बॅंकेची ७४ टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित २६ टक्के हिस्सेदारी बीएनपी पारिबा कार्डीफकडे आहे. 

आयसीआयसीआय लोम्बार्डचा आयपीओ १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान खुला होता. सध्या शेअर बाजारात ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ या एकमेव विमा कंपनीची नोंदणी झालेली आहे.

Web Title: arthavishwa news IPO open SBI life