जनता बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - जनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले, तर उपाध्यक्षपदी जगदीश कदम यांची आज एकमताने निवड करण्यात आली.

पुणे - जनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले, तर उपाध्यक्षपदी जगदीश कदम यांची आज एकमताने निवड करण्यात आली.

बॅंकेचे निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांची मुदत २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी राहणार आहे. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे- १) सर्वसाधारण मतदार संघ- विद्यानंद देवधर, जगदीश कदम, डॉ. मधुरा कसबेकर, बिरू खोमणे, संजय लेले, माधव माटे, सुनील मुतालिक, सुधीर पंडित, प्रभाकर परांजपे, लक्ष्मण पवार, महेंद्र पवार, मोहन फडके, किशोर शहा व अमित शिंदे, २) अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघ- रामदास शिंदे, ३) महिला राखीव मतदार संघ- ॲड. गौरी कुंभोजकर व ॲड. अलका पेटकर. 
याचवेळी अरविंद खळदकर आणि विजय भावे यांची तज्ज्ञ स्वीकृत संचालकपदी एकमताने नेमणूक करण्यात आली.