व्याजदर कपातीची शक्‍यता कमीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मंगळवारपासून सुरू झाली. या बैठकीमध्ये व्याजदर कपातीचा निर्णय होण्याची शक्‍यता नसल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीकडे उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे. या बैठकीतील निर्णय उद्या जाहीर होतील. ऑक्‍टोबरच्या आढावा बैठकीत व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याआधी ऑगस्टमध्ये झालेल्या आढावा बैठकीत कर्ज दरात ०.२५ टक्के कपात करून तो ६ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला होता. हा मागील सहा वर्षांतील नीचांकी दर ठरला होता. 

चलनवाढीचा आलेख चढता असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी पतधोरण आढाव्यात ‘जैसे थे’ धोरणास प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज बॅंकर आणि तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यापुढील काळात चलनवाढ आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यातच व्यवस्थेत कमी झालेली रोकड, ठेवींवरील वाढते व्याजदर यामुळे व्याजदर कपातीची शक्‍यता कमी असल्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

Web Title: arthavishwa news The likelihood of interest rates cut short