‘निफ्टी’चा १० हजारांना स्पर्श

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - शेअर बाजारात आज निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले; मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजारात नफा वसुली झाल्याने किंचित घसरण झाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज १०,०११.३० अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती; मात्र बाजार बंद होतेवेळी तो १० हजार अंशांच्या खाली व्यवहार करत स्थिरावला. निफ्टीअखेर २ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ९९६४.५५ पातळीवर बंद झाला, तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८ अंशांनी घसरून ३२२२८.२७ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्‍सने आज ३२,३७४.३० अंशांची सर्वोच्च पातळी गाठली होती.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह होता. दुपारच्या सत्रात ऑटो, एफएमसीजी, मीडिया, फार्मा, कॅपिटल गुड्‌स कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने शेअर बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाले.
आज मुंबई शेअर बाजारात वेदांत, इंडियाबुल्स हाउसिंग, हिंदाल्को, ॲक्‍सिस बॅंक, भारती एअरटेल, टीसीएस, टाटा स्टील आणि अदानी पोर्टस यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते, तर झी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, लुपिन, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डी, कोल इंडिया आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.