बिटकॉइन एक्‍स्चेंजवर देशभरात छापे

बिटकॉइन एक्‍स्चेंजवर देशभरात छापे

नवी दिल्ली - देशभरातील प्रमुख बिटकॉइन एक्‍स्चेंजवर करचुकवेगिरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे घातले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर तपास शाखेच्या अंतर्गत असलेल्या पथकांनी देशभरात नऊ बिटकॉइन एक्‍स्चेंजवर छापे घातले. यामध्ये दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, कोची आणि गुडगाव येथील एक्‍स्चेंजचा समावेश आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ‘१३३ अ’ नुसार गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी आणि व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तसेच, या व्यवहारांशी निगडित बॅंक खात्यांची तपासणी करण्यासाठी हे छापे घालण्यात आले. छापा घालणाऱ्या पथकांकडे या एक्‍स्चेंजमधील आर्थिक व्यवहारांची माहिती होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. बिटकॉइन

एक्‍स्चेंजवरील ही आतापर्यंत देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. बिटकॉइन ही व्हर्च्युअल करन्सी असून, भारतात त्यावर अद्याप सरकारी नियंत्रण नाही. बिटकॉइनबद्दल जगभरातील बॅंकांकडून मागील काही काळापासून चिंता व्यक्त केली जात आहे. 

रिझर्व्ह बॅंकेचा इशारा 
बिटकॉइनसह इतर व्हर्च्युअल करन्सी वापरणारे आणि व्यापाऱ्यांना रिझर्व्ह बॅंकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. तसेच, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मार्चमध्ये आंतरविभागीय समिती भारत आणि जगातील व्हर्च्युअल करन्सीचा आढावा घेण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. ही समिती व्हर्च्युअल करन्सीबाबतच्या उपाययोजनाही सुचविणार आहे. 

पुण्यातही छापे
पुणे - पुण्यात भवानी पेठ आणि हिंजवडीतही सात सदस्यांच्या एका पथकाने शोधमोहीम राबवली. प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, बॅंक खाती, गुंतवणूकदार आणि त्यांच्या व्यवहारांसंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे या पथकाने जप्त केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com