‘रोटोमॅक’च्या कोठारीची ‘सीबीआय’कडून चौकशी

Vikram Kothari
Vikram Kothari

नवी दिल्ली - रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी, त्याचा मुलगा राहुल याची ३ हजार ६९५ कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी दिल्लीतील मुख्यालयात चौकशी केली. 

याआधी ‘सीबीआय’ने कानपूरमध्ये कोठारी याची चौकशी केली होती. आज कोठारी आणि त्याच्या मुलाला दिल्लीत चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल हे रोटोमॅकचे संचालक आहेत. त्यांनी कर्जाचे पैसे दुसऱ्या कारणासाठी वळविल्याचा आरोप आहे. रोटोमॅकने कर्ज घेतलेल्या बॅंकांपैकी बॅंक ऑफ बडोदाने या प्रकरणी ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल केली आहे. कोठारी हा भारतातून पलायन करण्याची शक्‍यता असल्याने बॅंक ऑफ बडोदाने ‘सीबीआय’कडे धाव घेतली होती. या प्रकरणी सीबीआयने १८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com