निर्देशांकाने ओलांडला ३६ हजार अंशांचा टप्पा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवल्याने शेअर बाजारातील तेजीला बळ मिळाले. किरकोळ, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने शेअर बाजाराने आज ३६ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. परकी गुंतवणुकीचा ओघ कायम असल्याने निर्देशांकाने अवघ्या पाच सत्रांमध्ये तब्बल एक हजार अंशांची झेप घेतली आहे. दिवसअखेर तो ३४१.९७ अंशांच्या वाढीसह ३६ हजार १३९.९८ अंशांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातही नव्या विक्रमाची नोंद झाली. निफ्टीमध्ये ११७.५० अंशांची वाढ झाली आणि तो प्रथमच ११ हजार ८३.७० अंशांवर बंद झाला. 

भारत पुन्हा एकदा आशियातील वेगाने विकासित होणारी अर्थव्यवस्था असा लौकिक प्राप्त करेल, असे ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. मेटल, बॅंकिंग, आयटी आणि पायाभूत सेवा क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून आली. शेअर बाजारात तब्बल वर्षभरापासून तेजीची लाट (बुल रन) आहे. आर्थिक सुधारणांमुळे देशांतर्गत पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या वाढत्या किमतींकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करत खरेदीचा सपाटा कायम ठेवल्याचे शेअर दलालांनी सांगितले. मुंबई शेअर बाजारात एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, येस बॅंक, मारुती आदी महत्त्वाचे शेअर वधारले. मेटल इंडेक्‍समध्ये ४.२९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. पीएसयू इंडेक्‍स २.१५ टक्के, ऑइल अँड गॅस १.९३ टक्के, बॅंकेक्‍स १.६३ टक्‍क्‍यांनी वधारला. 

सोमवारी परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार ५६७ कोटी आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४६१ कोटींची खरेदी केली. १७ जानेवारी रोजी सेन्सेक्‍सने ३५ हजार अंशांची पातळी ओलांडली होती. सेन्सेक्‍सला ३६ हजार अंशांचा टप्पा गाठण्यासाठी पाच सत्रांचा कालावधी लागला. निफ्टीला १० हजारांवरून ११ हजार अंशाचे अंतर कापण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.

Web Title: arthavishwa news sensex cross to 35000