पंधराशे कोटी जमा करा

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

सर्वोच्च न्यायालयाचा ‘सहारा’ला आदेश
नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना येत्या सात सप्टेंबरपर्यंत रु. १५०० कोटी सेबी-सहारा रिफंड खात्यात जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. दरम्यान, रॉय यांना यापूर्वीच मंजूर झालेल्या ‘पॅरोल’ची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १० ऑक्‍टोबरपर्यंत वाढविली.

रॉय यांनी १५ जुलैपर्यंत रु. ५५२.२१ कोटी रुपये ‘सेबी’च्या रिफंड खात्यात भरण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यापैकी रु. २४७ कोटी जमा केले असल्याची माहिती त्यांचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाला दिली. उर्वरित रु. ३०५.२१ कोटी येत्या १२ ऑगस्टपर्यंत जमा केले जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. तथापि, रॉय यांच्याकडून सात सप्टेंबरपर्यंत जमा केल्या जाणाऱ्या रु. १५०० कोटींमध्ये या उर्वरित रु. ३०५.२१ कोटींच्या रकमेचाही समावेश असावा, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सहारा समूहाच्या ‘ॲम्बी व्हॅली’ या मालमत्तेच्या लिलावासंदर्भात विक्री नोटीस प्रसिद्ध करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत लिक्विडेटरना खंडपीठाने केली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला निश्‍चित करण्यात आली आहे.