विश्वेश्वर बॅंकेच्या अध्यक्षपदी गाडवे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे यांची, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मिरजे यांची २०१७-१८ या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बॅंकेच्या मुख्यालयात ॲड. शशिकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेस संचालक मंडळातील सर्व सदस्य, तसेच बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चिंतामणी वैजापूरकर उपस्थित होते. गाडवे हे पुण्यातील काका हलवाई फर्मचे भागीदार असून, मिरजे हे उद्योजक आहेत.