बुडित कर्जांमधील वाढीमुळे अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली: अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये तिमाही निकालांच्या घोषणेनंतर आज(शुक्रवार) इंट्राडे व्यवहारात साडेसहा टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत बँकेचा नफा 73 टक्क्यांनी घसरुन 580 कोटी रुपयांवर पोचला आहे. बुडित कर्जात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेअरवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

यादरम्यान, बँकेचे एकुण उत्पन्न 12,531 कोटी रुपयांवरुन 14,501 कोटी रुपयांवर पोचले आहे. याशिवाय, बँकेचे इतर उत्पन्न 2,338 कोटी रुपयांवरुन 3,400 कोटी रुपयांवर पोचले आहे. सरलेल्या तिमाहीत बँकेच्या बुडित कर्जांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात अॅक्सिस बँकेच्या एकुण(ग्रॉस) बुडित कर्जाचे प्रमाण 1.68 टक्क्यांवरुन 5.22 टक्क्यांवर पोचले आहे. याशिवाय, निव्वळ(नेट) बुडित कर्जाचे प्रमाण 0.75 टक्क्यावरुन 2.18 टक्क्यांवर पोचले आहे.

डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये बँकेचे एकुण उत्पन्न 60 टक्क्यांनी घसरुन 2,454 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये बँकेला 6,069 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

मुंबई शेअर बाजारात अॅक्सिस बँकेचा शेअर सध्या(1 वाजून 7 मिनिटे) 456.70 रुपयांवर व्यवहार करत असून 5.58 टक्क्याने घसरला आहे.

अर्थविश्व

मुंबई: दोनशे रुपये मूल्याची नोट उद्यापासून (ता.25) चलनात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. दोनशेच्या नोटेमुळे...

02.12 PM

मुंबई: 'रिलायन्स जिओ'चा बहुचर्चित जिओ फीचर फोनसाठी आज (गुरुवार) संध्याकाळपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आज फीचर फोन...

01.03 PM

नवी दिल्ली - माजी गव्हर्नर रघुराम राजन आता रिझर्व्ह बॅंकेच्या प्रमुखपदाच्या कालखंडावर पुस्तक लिहिणार आहेत. यामध्ये भारतीय...

09.30 AM