रुपयाला ‘बुरे दिन’ 

पीटीआय
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजदरवाढीची शक्‍यता आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव भडकल्याने चलन बाजारात डॉलरला मागणी वाढली आहे. याचा फटका रुपयाला बसला असून, सलग सहाव्या सत्रांत रुपयाचे मूल्य घसरले आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात ३६ पैशांची घसरण होऊन तो ६६.४८ रुपयांवर आला.

जागतिक बाजारातील घडामोडींमुळे चलन बाजारात रुपयाची मागील काही दिवसांपासून दमछाक होत आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत आठ हजार कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. याचा फटका रुपयाला बसला असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. आगामी पतधोरणात व्याजदरवाढीचे सूतोवाच रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या इतिवृत्तात करण्यात आले आहेत. रुपयाची आजचा भाव हा गेल्या १३ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. यापूर्वी १० मार्च२०१७ मध्ये त्याने ही पातळी गाठली होती.

Web Title: Bad day on rupee