बजाज अलायन्झची नवी गुंतवणूक योजना 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

मुंबई : खासगी विमा कंपनी असलेल्या बजाज अलायन्झने आरोग्य संरक्षणासह मालमत्ता वृद्धी देणारी फ्युचर हेल्थ गेन ही नॉन पार्टिसिपेटींग यूएलआयपी गुंतवणूक योजना बाजारात दाखल केली आहे.

मुंबई : खासगी विमा कंपनी असलेल्या बजाज अलायन्झने आरोग्य संरक्षणासह मालमत्ता वृद्धी देणारी फ्युचर हेल्थ गेन ही नॉन पार्टिसिपेटींग यूएलआयपी गुंतवणूक योजना बाजारात दाखल केली आहे.

या योजनेंतर्गत ग्राहकाला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा खर्च दिला जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना गुंतवणुकीसाठी निधी इक्विटी आणि डेट फंडाची निवड करण्याची संधी देण्यात आली आहे. गॅरंटीड लॉयल्टी ऑडिशनमुळे योजनेतून जास्तीत जास्त परतावा मिळतो. 25 वर्षांच्या कालावधीत एका वर्षाच्या प्रिमियमवर 30 टक्के लॉयल्टी दिली जाते. दर पाच वर्षांनी देयके दिली जातात, असे कंपनीने म्हटले आहे. नुकताच बजाज अलायन्झने 50 हजार कोटींचा टप्पा पार केला.