बँक कर्मचारी आज-उद्या संपावर 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

बँक कर्मचारी संघटनांच्या "युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने संपाची हाक दिली आहे. सर्व प्रमुख सरकारी बँकांसोबतच साउथ इंडियन बँक, कर्नाटक बँक, धनलक्ष्मी बँक, लक्ष्मीविलास बँक यासारख्या जुन्या खासगी बँका त्याचप्रमाणे स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकांसारख्या परदेशी बँकांमधील जुने कर्मचारी असे दहा लाख बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

नवी दिल्ली - वेतनवाढीच्या मुद्द्यावर देशभरातील 21 सरकारी बँका, जुन्या खासगी बँका आणि परदेशी बँकांमधील तब्बल दहा लाख बँक कर्मचारी आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) संपावर जाणार आहेत. 

बँक कर्मचारी संघटनांच्या "युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने संपाची हाक दिली आहे. सर्व प्रमुख सरकारी बँकांसोबतच साउथ इंडियन बँक, कर्नाटक बँक, धनलक्ष्मी बँक, लक्ष्मीविलास बँक यासारख्या जुन्या खासगी बँका त्याचप्रमाणे स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकांसारख्या परदेशी बँकांमधील जुने कर्मचारी असे दहा लाख बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

बँक कर्मचारी आणि सरकार यांच्यातील समेटाचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे देशभरातील बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर जाणार आहेत. सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यांना एक नोव्हेंबर 2017 पासून सुधारित वेतन हवे आहे. 
इंडियन बॅंक्‍स असोसिएशने (आयबीए) दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला आहे, तर कर्मचारी संघटनांची प्रतिनिधी संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनची वाढीव वेतनासाठी सुधारित प्रस्तावाची मागणी आहे. मात्र, "आयबीए'ने वेतन आढाव्याचा सुधारित प्रस्ताव दिलेला नसल्यामुळे या कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Bank unions plan two-day strike from May 30