9 दिवसांत 5 लाख कोटींहून अधिक ठेवी जमा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : काही दिवसांतच बँकांमध्ये मोठ्या ठेवी जमा झाल्या आहेत. याचा बँकिंग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. त्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. 

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 18 नोव्हेंबर या काळात नागरिकांनी बँकांमध्ये जुन्या नोटांच्या स्वरुपात 5 लाख 11 हजार 565 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. तसेच 33 हजार 6 कोटी रुपयांची रक्कम नागरिकांनी बदलून घेतली आहे. यादरम्यान नागरिकांनी बँका आणि एटीएममधून 1 लाख 3 हजार 316 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.