बॉश इंडियाची "स्मार्ट सोल्युशन्स' 

पीटीआय
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

बंगळूर - तंत्रज्ञान सेवा पुरवठादार बॉश समूह तंत्रज्ञान विकासासाठी या वर्षात अकराशे कोटींची गुंतवणूक करणार आहे. "बियॉंड मोबिलिटी'चा वेध घेत तयार केलेल्या स्मार्ट सोल्युशन्सच्या माध्यमातून स्मार्टसिटी, सोलर मिशन यांसारख्या उपक्रमांमध्ये "बॉश इंडिया' आक्रमकपणे सहभागी होणार आहे. 

नुकतेच कंपनीने बंगळूरमध्ये "बियॉंड मोबिलिटी' उपक्रमाचे उद्‌घाटन केले. "बॉश लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक व बॉश इंडियाचे अध्यक्ष स्टीफन बर्न्स म्हणाले, ""भारतीय बाजारपेठेत तंत्रज्ञानावरील आधारित सेवा आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांना मोठी मागणी आहे. ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी स्मार्ट उत्पादने आणि सोल्युशन्स हवी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी बॉश इंडिया कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान विकासासाठी या वर्षात अकराशे कोटींची गुंतवणूक करणार आहे.'' बियॉंड मोबिलिटीचा भारतात 15 टक्के हिस्सा असून, अर्थव्यवस्थेची वाढ पाहता यात मोठ्या संधी असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

विमानतळांचाही विकास 
स्मार्ट सिटीमधील दळणवळण यंत्रणा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट, पार्किंग आदी सोल्युशन्स कंपनीने विकसित केली आहेत. त्याबरोबर विमानतळांचाही कंपनीकडून विकास केला जाणार आहे. यात आधुनिक सुरक्षा यंत्रणा, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, ग्रीन बिल्डिंग यांचा वापर करण्यात येत असल्याचे "बॉश इंडिया'च्या ऊर्जा विभागाचे प्रमुख वेणुगोपाल सी. एम. यांनी सांगितले.