#अर्थसंकल्प2017 : शेअर बाजाराकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

टीम ई सकाळ
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

अर्थसंकल्प म्हणजेच बोली भाषेत प्रचलित असलेला 'बजेट'चा हा दिवस सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दारिद्र्यरेषेखालील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आणि चतुर्थश्रेणीतील चाकरमान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच बजेटमध्ये जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांचा, निर्णयांचा कमी-अधिक प्रमाणात लाभ होतो किंवा झळ बसत असते. 

आपल्या दृष्टिकोनातून वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात या बजेटचा काय परिणाम होणार आहे? तुमच्याच शब्दांत थोडक्यात शेअर करा. 

आमच्यापर्यंत आपले मत पोचवा : 

  • प्रतिक्रियांच्या माध्यमातून...
  • सविस्तर विश्लेषण webeditor@esakal.com वर ईमेल करा. Subject मध्ये लिहा : Budget2017
  • सकाळ संवाद मोबाईल अॅपवरून आपले मत, विश्लेषण आमच्यापर्यंत पोचवू शकता. 
  • @eSakalUpdate ला तुमचे मत थोडक्यात ट्विट करा
  • फेसबुकवर कॉमेंट करा : www.facebook.com/SakalNews/

मुंबई: शेअर बाजाराने नोटाबंदीनंतर सादर करण्यात आलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारला आहे. सध्या (दुपारी 2 वाजता) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 408 अंशांनी वधारला असून 28012.98 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 119 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या 8680.45 पातळीवर व्यवहार करतो आहे. 

क्षेत्रीय पातळीवर बांधकाम आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आज सर्वाधिक वधारले आहेत. त्यापाठोपाठ ऑटो, एफएमसीजी क्षेत्र वधारले आहे. बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक 4.22 टक्के आणि बँकिंग निर्देशांक 2.24 टक्के वधारला आहे. 
पीएसयू बॅंक निर्देशांक 3.2 टक्के आणि खाजगी बँकांचा निर्देशांक 1.6 टक्क्यांनी वधारला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील खरेदीचा जोर आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, ग्रासिम, एचडीएफसी, आयटीसी, गेल यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर एचसीएल टेक, टीसीएस, आयडिया सेल्युलर, टेक महिंद्रा, अरबिंदो फार्मा, डॉ रेड्डीज, इन्फोसिस, सन फार्मा आणि लुपिन यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.