मोदी सरकारने केलेल्या ‘नोटाबंदी’मुळे नोटप्रेसला रु.577 कोटींचे नुकसान

पीटीआय
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीचा आता थेट सरकारी मुद्रणालयांना फटका बसला आहे. सरकारी मुद्रणालयांनी मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे सुमारे रु.577 कोटींचे नुकसान झाल्याचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. आता त्यांनी थेट रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यामुळे आता आरबीआय पुढे पेच उभा राहिला आहे.

सरकारकडे सध्या नोटांची छपाई करणारी चार मुद्रणालये असून नोटाबंदीमुळे या चारही मुद्रणालयांना मोठा फटका बसला आहे.
नोटाबंदीपूर्वी पाचशे आणि एक हजाराच्या या सरकारी मुद्रणालयांमध्ये छापल्या जाणार्‍या नोटांसाठी लागणार्‍या कागदांची आयात केली जात होती. आता दोन हजार आणि पाचशे नोटांसाठी लागणारा कागद आणि शाई देशातीलच वापरली जाते. त्यामुळे नोटाबंदी आधीची शाई आणि छपाईसाठी लागणार्‍या सामग्रीच्या किंमतीचाही मुद्रणालयांनी या नुकसानाच्या रकमेत समावेश केला आहे. शिवाय यात नोटांच्या छपाईसाठी झालेल्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.

नोटाबंदीनंतर चलनात असलेल्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचे डिझाइन भारतातच तयार करण्यात आले आहे. शिवाय नोटा छपाईसाठी लागणार कागद आणि शाई देखील देशातच तयार केली जाते.