चीनच्या परकी गंगाजळीत वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

बीजिंग : चीनच्या परकी गंगाजळीत सलग चौथ्या महिन्यामध्ये वाढ झाली आहे.

एप्रिलमध्ये चीनची परकी गंगाजळी 21 अब्ज डॉलरने वाढत 3.03 अरब डॉलरच्या घरात पोचली आहे, अशी माहिती पीपल्स बॅंक ऑफ चायनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या अपेक्षेनुसार परकी गंगाजळी 11 अब्ज डॉलरने वाढण्याचा अंदाज होता. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त वाढ झाल्याने आता चीनचे चलन युआनला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून युआनचा डॉलरच्या तुलनेतील कामगिरी स्थिर दर्शवित आहे.

चीनने भांडवल देशाबाहेर जाऊ नये म्हणून कडक नियम केले असून त्यामुळे परकी गंगाजळीत वाढ दिसून येत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स