अमेरिकन रोजगारनिर्मितीमुळे महागले कच्चे तेल

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

सिंगापूर : अमेरिकी रोजगार अहवालात होत असलेल्या प्रगतीमुळे जागतिक बाजारामध्ये डॉलरने उसळी घेतली. या उसळीने आशियाई तेल बाजारावर दबाव येऊन तेलाच्या किमती वाढल्या. 

सिंगापूर : अमेरिकी रोजगार अहवालात होत असलेल्या प्रगतीमुळे जागतिक बाजारामध्ये डॉलरने उसळी घेतली. या उसळीने आशियाई तेल बाजारावर दबाव येऊन तेलाच्या किमती वाढल्या. 

जून महिन्यामध्ये जागतिक अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेने 2 लाख 87 हजार रोजगार निर्माण केल्याने रोजगार अहवालात कमालीची प्रगती झाली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये घसरत असलेल्या डॉलरने पुन्हा उसळी घेतली. डॉलरचा परिणाम इतर बाजारांवर होत असून, आशियाई बाजारातही तेलाच्या किमती वाढल्याचे चित्र आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून जागतिक तेल बाजारात आधीच भडका उडालेला, अमेरिकी रोजगार अहवालाने तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 30 डॉलरच्या वर पोचल्या आहेत. मात्र 2014 मध्ये वाढलेल्या किमती अर्थात 100 अमेरिकी डॉलर प्रतिबॅलरचा आकडा अजून खूप दूर असल्याने तूर्तास तेल बाजारात दिलासादायक चित्र आहे. 

Web Title: crude oil prices go up

टॅग्स