निर्यात वाढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारताच्या निर्यातीमध्ये सलग दुसऱ्या महिन्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. भारताची निर्यात ९.५९ टक्‍क्‍यांनी वाढली असून, ऑक्‍टोबर अखेरपर्यंत व्यापारी तूट २३.५१ अब्ज डॉलरवर गेली आहे. दागिन्यांची वाहतूक व अभियांत्रिकी उत्पादनांमध्ये झालेली वाढ यामुळे निर्यातीत वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. 

अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात १३.८६ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हिरे आणि दागिन्यांची निर्यात २१.८४ टक्‍क्‍यांनी वाढली असून, पेट्रोलियम व रसायनांची निर्यात अनुक्रमे ७.२४ टक्के व ६.६५ टक्‍क्‍यांनी वाढली असल्याचे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले.

भारताची आयातही ८.११ टक्‍क्‍यांनी वाढली असून, व्यापारी तूट १०.१६ अब्ज डॉलरवर पोचली आहे. तेलाच्या आयातीमध्ये ऑक्‍टोबरमध्ये ३.९८ टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. तेल वगळता अन्य आयात ९.२८ टक्के झाली आहे. डिसेंबर २०१४ पासून भारताच्या निर्यातीमध्ये सलग अठरा महिने घट होत होती. जुलै, ऑगस्टमध्ये निर्यात नकारात्मक पातळीवर होती.

अर्थविश्व

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी डॉ. विशाल सिक्‍...

02.45 AM

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017