“ईपीएफओ’ शेअर्समधील गुंतवणूक वाढवणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे(ईपीएफओ) भांडवली बाजारातील गुंतवणूकीचे प्रमाण वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीचे प्रमाण 15 टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव मंडळाकडून मंजुर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे(ईपीएफओ) भांडवली बाजारातील गुंतवणूकीचे प्रमाण वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीचे प्रमाण 15 टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव मंडळाकडून मंजुर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. त्यासंदर्भात आज ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक पार पडणार आहे.

याआधी 30 मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पुन्हा एकदा गुंतवणूकवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. याशिवाय, ईपीएफओ योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी वेतनाची मर्यादा 25,000 रुपये करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. सध्या ही मर्यादा 15,000 रुपयेएवढी आहे. त्याचप्रमाणे, अपारेल आणि हातमाग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पीएफ योगदान ऐच्छिक करता येईल का याविषयी चर्चा होणार आहे.

Web Title: EPFO board to decide on raising investment in stocks to 15%