फार्मा कंपन्यांमध्ये उत्साह

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

नवी दिल्ली : अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) फार्मा कंपन्यांना कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे जेनेरिक औषध 'जेटिया' सादर करण्यास मंजुरी मिळाली आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात फार्मा कंपन्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अमेरिकेत कोलेस्ट्रॉलशी संबंधित औषधांची वार्षिक 270 कोटी डॉलरची उलाढाल आहे. यामुळे फार्मा कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता बाजारातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

यूएसएफडीएने सन फार्मा, कॅडीला हेल्थकेअर, टेवा फार्माला 'जेटिया'च्या उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी दिली आहे. कॅडीला हेल्थकेअर आता गुजरातमधील मोरिया येथील प्रकल्पातून 'जेटिया'चे उत्पादन करणार आहे.

ग्लेनमार्क फार्माला फटका बसणार:

यूएसएफडीएने 'जेटिया'च्या औषधाच्या उत्पादनाला परवानगी दिल्याने याचा फटका ग्लेनमार्क फार्माला बसण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत फक्त ग्लेनमार्ककडे 'जेटिया'च्या औषधांची निर्मिती करण्याचा एकाधिकार होता. डिसेंबर 2016 मध्ये ग्लेनमार्कचे औषध बाजारात दाखल केले होते. आता मात्र 180 दिवसांच्या आत ग्लेनमार्क फार्माचा एकाधिकार संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्लेनमार्क फार्माला मोठ्या प्रमाणात स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.