एफ-16 विमानांची आता भारतात निर्मिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

एफ-16साठी लॉकहिड मार्टिन कंपनीचा "टाटा'सोबत करार

नवी दिल्ली : अमेरिकेतील एफ-16 लढाऊ विमान आता भारतात तयार होणार आहे. एफ-16 विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने "टाटा'सोबत करार केला आहे. पॅरिसमधील एअर शो दरम्यान हा करार झाल्याचे सूत्रांकडून समजते.

एफ-16साठी लॉकहिड मार्टिन कंपनीचा "टाटा'सोबत करार

नवी दिल्ली : अमेरिकेतील एफ-16 लढाऊ विमान आता भारतात तयार होणार आहे. एफ-16 विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने "टाटा'सोबत करार केला आहे. पॅरिसमधील एअर शो दरम्यान हा करार झाल्याचे सूत्रांकडून समजते.

वायूदलाच्या ताफ्यातील सोव्हिएतकालीन विमाने जुनी झाली असून, आता नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एफ 16 विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने भारताला विमान विकण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशांतर्गत विमान बांधणी क्षेत्राच्या विकासासाठी लढाऊ विमानांची निर्मिती भारतात व्हावी, असे वाटते. मोदी सरकारने तशी अटही कंपनीसमोर ठेवली होती. या अटींची पूर्तता करत "लॉकहिड'ने भारतात विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने "टाटा'सोबत करार केला असून, पॅरिसमध्ये हा करार झाला.

पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी "मेक इन इंडिया' मोहिमेला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असली तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाशी विसंगत असा हा करार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील कंपन्यांनी अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प सुरू करून रोजगार वाढवावा, अशी भूमिका मांडली आहे. भारतात प्रकल्प सुरू होणार असला तरी अमेरिकेतील रोजगारावर कपात येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींच्या वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

जगातील 26 देशांमध्ये एफ 16 हे लढाऊ विमान वापरले जाते. कंपनीने आत्तापर्यंत 3200 विमानांची निर्मिती केली आहे. भारतात एफ 16 गटातील ब्लॉक 70 हे अत्याधुनिक विमान तयार केले जाणार आहे.

भारताला शस्त्रास्त्र पुरवणारे देश
अमेरिका 1
रशिया 2
इस्रायल 3

ब्रिटनमध्ये पाच हजारांवर रोजगारनिर्मिती करणार
लंडन : टाटा मोटर्सच्या मालकीची जग्वार लॅंड रोव्हर (जेएलआर) प्रकल्पासाठी ब्रिटनमध्ये पाच हजारांवर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. लक्‍झरी कारनिर्मितीसाठी विशेषत: सॉफ्टवेअर तंत्रकौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची निवड करण्यात येणार आहे. आगामी दशकामध्ये वाहनविश्‍वामध्ये विविध बदल होणार असून, आम्ही जगभरातील सर्वोत्कृष्ट मनुष्यबळाच्या शोधात आहे, असे "जेएलआर'चे इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख ऍलेक्‍स ऍझलोप यांनी सांगितले.