फ्लिपकार्टचे सीएफओ संजय बावेजांचा राजीनामा

पीटीआय
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली: भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) संजय बावेजा यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. फ्लिपकार्टतर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेल्या बावेजा यांनी दोन वर्षांपुर्वी फ्लिपकार्टमध्ये प्रवेश केला होता. जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील 10 महिन्यांमध्येच राजीनामा सादर केला आहे. 

बावेजा यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण व त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. फ्लिपकार्टचे हेड ऑफ कॅटेगरी मॅनेजमेंट कल्याण कृष्णमुर्ती हे सीएफओची भूमिका तात्पुरती पार पाडू शकतात. याआधीही त्यांनी ही कामगिरी बजावली आहे. 

गेल्या काही काळात फ्लिपकार्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. मिंत्राचे संस्थापक व फ्लिपकार्टच्या कॉमर्स व अॅडव्हर्टायझिंग विभागाचे प्रमुख मुकेश बन्सल आणि कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अंकित नागोरी यांनी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला निरोप दिला होता. याशिवाय, कंपनीचा आर्थिक पातळीवरील संघर्ष सुरु आहे. दिवाळी सवलत योजनांनंतर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. कंपनीने काही दिवसांपुर्वी कॉस्ट-कटिंगअंतर्गत 1,000 कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे. फ्लिपकार्ट आता नव्या फेरीत निधी उभारण्याची तयारी करीत आहे. या फेरीत अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्टचा सक्रीय सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अर्थविश्व

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी डॉ. विशाल सिक्‍...

02.45 AM

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017