देशात सोन्याला मागणी कायम; आयातीत तिप्पट वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

नवी दिल्ली: अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोन्याला मागणी वाढल्याने या मौल्यवान धातूची आयात तिपटीने वाढली आहे. देशात एप्रिलमध्ये सोन्याची आयात 3.85 अब्ज डॉलरवर पोचली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात हे प्रमाण 1.23 अब्ज डॉलरएवढे होते.

सोन्याची आयात वाढल्याने व्यापारी तूटीत भरघोस वाढ झाली आहे. यामुळे एप्रिलमध्ये व्यापारी तूट 13.24 अब्ज डॉलरएवढी झाली आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये हे प्रमाण 4.84 अब्ज डॉलर होते. दरम्यान, चांदीची आयात 61 टक्क्यांनी वधारुन 35.3 कोटी डॉलरएवढी झाली.

याच काळात देशाच्या एकुण निर्यातीत एप्रिल महिन्यात 19.77 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून या काळात 24.63 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. पेट्रोलियम, टेक्सटाइल्स, इंजिनिअरिंग गूड्स आणि रत्ने व दागिन्यांना सर्वाधिक मागणी आल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. यादरम्यान, आयातदेखील 49.07 टक्क्यांनी वाढून 37.88 अब्ज डॉलरएवढी झाली आहे, अशी आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात निर्यातीचे प्रमाण 4.71 टक्के वाढीसह 274.64 अब्ज डॉलरवर पोचले आहे.

Web Title: Gold demand continues in gold; Imported triple rise