सीमाशुल्क विभागाच्या तिजोरीतून 2 कोटींचे सोने गायब

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या तिजोरीतून दोन हजार कोटी रुपये किमतीचे साडेआठ किलो सोने गायब झाल्याबाबत केंद्रीय अन्वेषणने तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमध्ये अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी स्वरूपातील विश्‍वासभंग या कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

साडेआठ किलो सोन्याच्या जागी बनावट सोने ठेवल्याचे आढळून आले. सुरवातील या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडे होती. मात्र त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविला. याचसोबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा दक्षता विभागही सीमाशुल्क विभागाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली सीमाशुल्क विभागाकडून 6 कोटी रुपये किमतीचे 23 किलोचे सोने गायब झाल्याची माहिती "माहिती अधिकारा'तून समोर आली आहे.

Web Title: Gold Missing From Customs Vault At Indira Gandhi International Airport