एक जुलैपासून सर्व राज्यात लागू होणार जीएसटी

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: बर्‍याच दिवसांपासून रखडलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या एक जुलैपासून सर्व राज्यांमध्ये जीएसटी लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ  खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली. नुकतीच जीएसटी कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारची बैठक झाली. बैठकीनंतर दास बोलत होते.
 
येत्या एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शवली असल्याचे दास यांनी सांगितले. दीर्घकाळापासून जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे जीएसटी कायदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता होती. मात्र आता एक जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्ये तयार झाली आहेत.
 
जीएसटी कायद्याबाबतीत इतकी उत्सुकता का?
कराचे दोन प्रकार. प्रत्यक्ष कर म्हणजे जो करदाता स्वतः च्या खिशातून भरतो. उदा. आयकर, मालमत्ता कर. आपल्या देशातील फक्त २-३% इतकेच लोक प्रत्यक्ष कर भरतात. अप्रत्यक्ष कर हा करदाता दुसऱ्याकडून वसूल करून सरकारला भरतो. उदा. विक्रीकर, उत्पादन शुल्क. अर्थ व्यवस्थेतील प्रत्येकजण या ना त्या मार्गाने अप्रत्यक्ष कर भरत असतो. उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यात हा कर वसुलला जातो. जीएसटी कायदा हा संपूर्ण देशातील सर्व राज्यातील अप्रत्यक्ष कर वसूल करण्याची पद्धती पूर्णपणे बदलणार आहे. देशभर सर्व उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ता हे सर्वजण फक्त हा एकच कर वसूल करतील आणि भरतील. प्रस्तावित कायद्याच्या देश व्यापी स्वरूपामुळे त्याला इतके महत्व मिळालेले आहे.
Web Title: GST will be implemented from first July