H1-B विधेयकामुळे IT कंपन्यांचे शेअर कोसळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज (मंगळवार) आयटी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले. अमेरिकी संसदेत एच 1- बी सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. प्रस्तावित विधेयकानुसार एच1-बी व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन 1 लाख 30 हजार डॉलर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना मोठा फटका बसणार आहे.

भारतातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीत 60 टक्के वाटा अमेरिकेचा आहे. परिणामी, आज भारतीय शेअर बाजारातील 5 दिग्गज आयटी कंपन्यांनी 50 हजार कोटींचे भांडवल गमावले आहे. यामध्ये टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांचा समावेश आहे.

आयटी कंपन्या आणि शेअर बाजारातील भाव

कंपनीचे नाव    शेअरचा भाव    घसरण (रु.मध्ये)     घसरण (टक्क्यांमध्ये)
1) विप्रो                   457.10            7.55                    (-1.62%)
2) इन्फोसिस          929.30           19.05                   (-2.01%)
3) एचसीएल टेक    808.85           30.85                  (-3.67%)
4) टेक महिंद्रा          451.75             19.95                    (-4.23%)
5) टीसीएस              2229.90           107.10                 (-4.58%)

Web Title: H1B amendment bill affects shares of IT companies