एचसीएल देणार 2,000 नोकऱ्या

 HCL To Recruit 2,000 IT Engineers At Upcoming Nagpur Campus
HCL To Recruit 2,000 IT Engineers At Upcoming Nagpur Campus

नागपूर येथील कॅम्पसमध्ये 2,000 नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. एकीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरु असताना एचसीएलने लहान शहरांमध्ये आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. याआधी मदुराई आणि लखनऊ येथे कंपनीची दोन केंद्रे सुरु झाली आहेत.

येत्या जानेवारी महिन्यात नागपूर येथील मिहान प्रकल्पात सुरु होणाऱ्या कॅम्पससाठी नियुक्तीची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होईल. या कॅम्पसमध्ये सुमारे 2,000 स्थानिक तरुणांना संधी दिली जाईल, असे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीविषयी बोलताना गुप्ता म्हणाले की, कंपनीचे बहुतांश काम भारतातूनच चालते. यामुळे एच1-बी व्हिसावरील बंधनांमुळे कंपनीला फारसा फरक पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com