भरत कौशल हिताची इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

मुंबई : ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांतील आघाडीची कंपनी असलेल्या हिताची इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भरत कौशल यांची निवड करण्यात आली आहे.

भरत कौशल 1 जून रोजी "हिताची'चे विद्यमान अध्यक्ष कोजीन नकाकिटा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. कौशल सध्या सुमटोमो मित्सुई बॅंकिंग कॉर्पोरेशनचे (एसएमबीसी) अध्यक्ष आहेत. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलेल्या भरत यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पदव्यत्तर पदवी मिळवलेली आहे. 