मी नोटा कशा बदलल्या?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुण्यातली बातमी होती, नोटांचे गठ्ठे कचरापेटीत सापडले. हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीतल्या उमेदवाराच्या दारात मतदार गेले आणि हजाराच्या नोटा बदलून मागितल्या. मुंबईत कचरा गोळा करणाऱयाला नोटांचे गठ्ठे सापडले.
सोन्या-चांदीचे भाव रातोरात वाढले.

पाचशे-हजाराच्या नोटा रातोरात रद्द झाल्याने खरंच ज्यांच्याकडं काळा पैसा होता, त्यांच्या 'अनुभवा'च्या बातम्या झाल्या. टीव्हीवर झळकल्या. आपणही चवीनं वाचल्या.

आपले अनुभव यापेक्षा वेगळे नक्कीच होते. 

खिशात पाचशेची एकच नोट आणि पेट्रोल नको असताना पाचशेचंच भरावं लागलं.
महिन्याची बिलं भागविण्यासाठी बँकांच्या दारात लांबच लांब रांगेत उभं राहावं लागलं.
कामं बाजूला ठेवून पाचशे-हजाराच्या नोटा शोधून शोधून त्या जमेल तिथं भरून नव्या नोटा घ्याव्या लागल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयावर झडणाऱया राजकीय चर्चा आपण रोजच एेकतोय आणि वाचतोय. अर्थतज्ज्ञही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अॅनॅलिसिस करताहेत. हा धुरळा बसायचा खाली तेव्हा बसू दे. 
हे सारं बाजूला ठेवूया. 
आजची मोठी पिढी 1978 च्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेची भागीदार नव्हती. या पिढीसाठी नोटा बदलण्याचा अनुभवच अगदी नवा कोराकरीत आहे. तो गंमतीशीर असेल; यातनादायी असेल; साधासुधा असेल. 
तो शेअर करूया...
कदाचित तुमचा अनुभव दुसऱयाला उपयोगी पडेल. त्याची यातायात वाचेल.
साऱयांना सांगूया. 
मी नोटा कशा बदलल्या?

तपशील जास्त असेल, तर ई मेल करा webeditor@esakal.com वर आणि Subject मध्ये लिहाः #IChangedNote

अर्थविश्व

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी डॉ. विशाल सिक्‍...

02.45 AM

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017