गुंतवणुकीची संधी: ‘हडको’चा आयपीओ 8 मे रोजी खुला होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

नवी दिल्ली: सरकारची गृहनिर्माण व नगरविकास कंपनी ‘हडको’च्या सुमारे 1,200 कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीला (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 8 मे रोजी सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 11 मेपर्यंत ‘हडको’च्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.

‘हडको’ने आयपीओच्या विक्रीसाठी प्रतिशेअर 56-60 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत, कंपनी केंद्र सरकार 10 टक्के हिस्सेदारी अर्थात दहा रुपये दर्शनी मूल्याचे 20 कोटींहून अधिक इक्विटी शेअर्स 'ऑफर फॉर सेल'द्वारे विकणार आहे. कंपनीतील कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना इश्यू प्राइसवर 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. आयपीओ खरेदीसाठी अंतिम तारीख 11 मे असून अँकर गुंतवणूकदारांना 5 मे रोजी कंपनीचे शेअर खरेदी करता येतील.

आयपीओच्या माध्यमातून मिळालेले भांडवल निर्गुंतवणूकीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सरकारी तिजोरीत जमा केले जाणार आहे. मार्च 2016 अखेर कंपनीचे 2,001 कोटी रुपयेएवढे भांडवल होते. सरकारची कंपनीत 100 टक्के हिस्सेदारी आहे.

हडकोच्या प्राथमिक समभाग विक्रीमुळे केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेला हातभार लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारची निर्गुंतवणूकीतून 56,500 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आहे.

Web Title: HUDCO IPO opens on May 8