औद्योगिक उत्पादनाला नोटाबंदीचा फटका

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे औद्योगिक उत्पादनाला फटका बसला असून, डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्के घसरण होऊन ती चार महिन्यांतील मोठी घसरण आहे.

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे औद्योगिक उत्पादनाला फटका बसला असून, डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्के घसरण होऊन ती चार महिन्यांतील मोठी घसरण आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आधारे औद्योगिक उत्पादन मोजले जाते. औद्योगिक उत्पादनात डिसेंबर 2015 मध्ये 0.9 टक्के घसरण झाली होती. याआधी ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनात 0.7 टक्के घसरण नोंदविण्यात आली होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन केवळ 0.3 टक्के वाढले आहे. त्याआधीच्या वर्षातील याच कालावधीत ही वाढ 3.2 टक्के होती. नोटाबंदीचा फटका उत्पादन क्षेत्राला सर्वाधिक बसला आहे. नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 5.7 टक्के होते. उत्पादन क्षेत्रात डिसेंबरमध्ये 2 टक्के घसरण झाली आहे. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात डिसेंबरमध्ये 6.8 टक्के घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये एफएमसीजी 5 टक्के आणि कॅपिटल गुडस्‌ 3 टक्के घसरण झाली आहे. ऊर्जानिर्मिती आणि खाणकाम क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.