भारतीय बाजारपेठ परकी गुंतवणुकीला पूरक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

योकोहामा (जपान): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) माध्यमातून अप्रत्यक्ष करांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नामुळे भारतीय बाजारपेठ ही निर्बंधरहित आणि परकी गुंतवणुकीला पूरक झाली आहे, असे एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (एडीबी) आज सांगितले; मात्र अद्याप चीनसारखी संपूर्ण क्षमता प्राप्त मिळवण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागतील, असेही "एडीबी'ने सांगितले.

एडीबीच्या पन्नासाव्या वार्षिक बैठकीला सदस्य देशांचे अर्थमंत्री व केंद्रीय बॅंकांचे गव्हर्नर उपस्थित होते. या वेळी "एडीबी'चे प्रमुख ताकेहिको नाकाओ यांनी सदस्य देशांशी संवाद साधला. चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर 7.4 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता एडीबीच्या प्रमुखांनी व्यक्त केली. गेल्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर 7.1 टक्के नोंदविण्यात आला होता. आगामी वर्षांमध्ये विकासदर 7.6 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यताही या वेळी व्यक्त करण्यात आली.

नाकाओ म्हणाले, की भारतामध्ये क्षमता भरपूर असली तरी बाजारपेठ ही एकत्रित आहे. राज्य सरकारांचे अधिकार हे केंद्र सरकारांच्या अधिकारांशी संतुलन ठेवत असल्याचेही ते म्हणाले. भारताची एकत्रित बाजारपेठ ही परकी गुंतवणुकीला आमंत्रण देत आहे. ही बाजारपेठ आशियाशी नव्हे, तर पूर्ण जगाशी जोडली जात आहे.

आशियाई बाजारपेठा या मुक्त व्यापाराचा लाभ उठवत आपला आवाका वाढवित आहेत. त्याबरोबर येथे गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचीही आवश्‍यकता आहे, असेही नाकाओ म्हणाले.

नोटाबंदीनंतरही अर्थव्यवस्था स्थिर
भारतामध्ये 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्या वेळी देशातील 80 टक्के चलन व्यवहारातून बाद करण्यात आले. त्याचे तत्कालीन परिणाम जाणवले; मात्र ते दीर्घकालीन नव्हते, याचमुळे सध्या भारतातील आर्थिक परिस्थिती स्थिर असल्याचे नोकाओ यांनी सांगितले. जीएसटीमुळे आर्थिक सुधारणांना वाव मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Indian market is too good for foreign investment : narendramodi