गुंतवणुकीची संधी: सीडीएसएलचा आयपीओ!

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई: देशात रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा देणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसचा (सीडीएसएल) आयपीओ 19 जून रोजी खुला होणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 21 जूनपर्यंत सीडीएसएलच्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी रु.145-149 किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई: देशात रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा देणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसचा (सीडीएसएल) आयपीओ 19 जून रोजी खुला होणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 21 जूनपर्यंत सीडीएसएलच्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी रु.145-149 किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे.

प्राथमिक समभाग विक्री योजनेअंतर्गत कंपनी एकुण 3.52 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. यापैकी 7 लाख शेअर्स कर्मचार्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मुंबई शेअर बाजार (बीएसई), स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आपल्या मालकीच्या 3.45 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. ऊर्वरित सात लाख शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे, अशी माहिती कंपनीने सादर केलेल्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती. सीडीएसएलच्या शेअर्सची राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.

सीडीएसल आणि एनएसडीएल या सध्या देशातील दोन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रोख्यांच्या भांडार असलेल्या संस्था आहेत. सीडीएसएलच्या डिमॅट खातेधारकांची संख्येने 2016 अखेर एक कोटी 60 लाखांचा टप्पा ओलांडला होता.

अर्थविश्व

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या...

09.15 AM

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला....

09.15 AM

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या...

09.15 AM