आर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ!

Sakal-Money
Sakal-Money

प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) चौकशीसाठी दूरध्वनीचा अक्षरशः पाऊस पडत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक भरभराटीची संधी उपलब्ध झाल्याने अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

बदलत्या काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली असून, ती मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. मराठीत अशी सुविधा ‘सकाळ मनी’च्या माध्यमातून प्रथमच सादर केली गेली आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहेच; पण त्याचबरोबर म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे ‘सकाळ मनी’ने आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांशी (एएमसी) सहयोग केला असून, तज्ज्ञ टीमकडून सखोल संशोधन करून त्यांच्या योजनांची निवड करण्यात आलेली आहे. नव्या रूपातील www.sakalmoney.com  या साइटवर मराठीत ‘तुमचे उद्दिष्ट’ किंवा इंग्रजीत ‘सेट अ गोल’ या टॅबवर क्‍लिक केल्यानंतर वाचकांचे उद्दिष्ट, वय, कालावधी, अपेक्षित रक्कम, चलनवाढ आणि जोखीम घेण्याची क्षमता, अशा गोष्टी जाणून घेऊन गुंतवणुकीची वर्गवारी तत्काळ करून मिळते आणि त्यानुसार प्रत्यक्ष गुंतवणूक करता येते. यासाठी ‘सकाळ मनी’च्या वेबसाइटवर खास ‘ऑटोमेटेड’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. 

या नव्या वेबसाइटवर आपले ऑनलाइन खाते अगदी सोप्या पद्धतीने विनामूल्य सुरू करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या वैयक्तिक तपशिलांसह नोंदणी करून आणि ‘केवायसी’च्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे खाते सुरू होणार आहे. हे व्यवहार सुरक्षितपणे आणि तत्परतेने होण्यासाठी ‘सकाळ मनी’ने बाँबे स्टॉक एक्‍स्चेंजच्या स्टार म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे.

गुंतवणूक सल्लागारांना संधी 
सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात असंख्य अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी एजंट, पिग्मी एजंट काम करताना दिसतात. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा वाढलेला कल लक्षात घेऊन या प्रतिनिधींनाही या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आवश्‍यक ती पात्रता परीक्षा आणि प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाची साथ ‘सकाळ मनी’कडून मिळणार आहे. थेट गुंतवणूकदारांकडे जाण्याऐवजी या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच गुंतवणूकदारांपर्यंत पोचण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागेल. तसेच फक्त कार्यालयीन वेळेत (सकाळी दहा ते सायंकाळी पाच) पुणे - ९५९५९८२३३७, मुंबई - ९३२२६६३२५५, कोल्हापूर - ७४४७४८३३८८, नाशिक - ९९६०९१६८३५ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com