‘जिओ’ची पुन्हा नवी ऑफर

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई: "धन धना धन' ऑफर संपण्यापूर्वीच "रिलायन्स जिओ'ने ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. "रिलायन्स जिओ'ने यापूर्वीच धमाकेदार ऑफर देऊन दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडविली आहे. आता पुन्हा नवी ऑफर आणून कंपनीने इतर कंपन्यांपुढे आव्हान उभे केले आहे. नव्या ऑफरमध्ये जिओ 224 जीबीपर्यंत फोरजी डेटा देणार आहे.

चालू महिन्यात "जिओ'ची "धन धना धन ऑफर' संपणार आहे. त्यामुळे आता "जिओ'च्या ग्राहकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावे लागणार आहे. आता नवा प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना नवे "जिओ फाय' किंवा नवे सिम खरेदी करावे लागणार आहे. यासाठी ग्राहकांना 99 रुपयांची प्राइम मेंबरशिप देण्यात येणार आहे. त्यानंतर 149, 309 आणि 509 या पैकी एका प्लॅनची निवड करावी लागणार आहे.